मुंबई हून गोव्याला फिरायला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. रस्ता वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई ते गोवा दरम्यान फेरी बोट सेवा सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय जलमंत्री नितीन गडकरी ह्यांनी मंगळवारी हि माहिती दिली. ह्यामुळे अनेकांचे गोव्याला जाण्याचे मनसुबे फळाला येणार आहेत. प्रवासी आणि कार्गो वाहतूकहि बोटीमधून केली जाणार असून त्यामुळे वेळ तर वाचणार आहेच शिवाय प्रदूषण हि कमी होणार असल्याचे गडकरींनी सांगितले. कोकण निमित्ताने गोव्याला जाणारे रस्ते अनेक वर्षांपासून वाईट अवस्थेत आहेत. आता ह्या फेरी बोट मुळे प्रवास अगदी सुखकर आणि मजेशीर होणार आहे. दाबोळी आणि मोपा विमानतळ जलमार्गाने जोडण्याच्या शक्यतेवर विचार सुरु असून गोव्यात जलमार्ग विकसित करतांना पर्यावरणाचे भान राखले जाणार असल्याचे सुद्धा गडकरींनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews